१७११ साली ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन झाली — साउथ सी कंपनी. सरकारच्या डोक्यावरील कर्ज फेडण्याची जबाबदारी घेऊन, त्याबदल्यात सरकारकडून ठराविक भागांमध्ये व्यापाराचे मक्तेदारी हक्क या कंपनीने मिळवले.
पण अपेक्षेप्रमाणे व्यवसाय विस्तार झाला नाही आणि कंपनीला मोठा नफा कमवता आला नाही.या सर्वाचा परिणाम म्हणून कंपनीचा शेअर जानेवारी १७२० मध्ये १२८ रुपयांच्या आसपास होता. कंपनी संचालकांनी शेअरच्या बाजारभाव वाढवावा म्हणून कंपनीच्या यशाचा फुगा फुगविला व बातम्या लोकांमध्ये पसरवू सुरु केल्या. त्याचा परिणाम एका महिन्यात म्हणजे फेब्रुवारी १७२० मध्येच शेअरचा भाव १७५ रुपयांपर्यंत पोहोचला.पुढील काही महिन्यांत कंपनीने सरकारला आपल्या व्यवसायाची कशी भरभराट होत आहे हे फुगवून सांगितले आणि सरकारकडून अधिक आर्थिक सवलती मिळवल्या.
ही बातमी बाजारात वेगाने पसरली आणि गुंतवणूकदारांच्या मनात कंपनीबाबत विश्वास वाढला. याचा परिणाम म्हणजे महिन्याभरात म्हणजेच मार्चमध्ये शेअरचा भाव ३३० रुपयांपर्यंत गेला.त्यानंतर अगदी थोड्याच कालावधीत सर्वसामान्य लोकांच्या जीवावर कंपनीच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला. प्रत्येक गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी झुंजू लागला. अपेक्षेप्रमाणे म्हणजे जून १७२० मध्येच अश्या बाजारात १००० रुपयांच्या सर्वोच्च भावाला पोहोचला.
पण हा बुडबुडा कधीतरी फुटणारच होता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
💣 हळूहळू खरी माहिती बाहेर यायला लागली. कंपनीचा पाया कमकुवत होता हे उघड झालं. गुंतवणूकदारांचा विश्वास ढासळला आणि सप्टेंबर १७२० मध्येच शेअर गेला ₹१५० वर — म्हणजे ८५% घसरण!
या फसवणुकीत अनेक सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झालेच, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर आयझॅक न्यूटन देखील यात अडकले. हो तेच गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधणारे महान वैज्ञानिक, त्यांनीही या कंपनीत पैसे गुंतवले होते!
🚀 न्यूटनने सुरुवातीला कमी भावात शेअर खरेदी करून जवळपास ७००० पाउंड्स नफा कमावला होता. पण आपण विक्री केल्यानंतरही शेअरचा भाव वाढताना पाहून लोभामुळे त्यांनी नंतर पुन्हा शेअर खरेदी केले — आणि तेव्हा शेअर गडगडला. शेवटी त्यांना २००० पाउंड्स (आजच्या रकमेत लाखो रुपये!) नुकसान सहन करावं लागलं.
🧠 “मी भौतिकशास्त्रातील गुंतागुंतीचे नियम शिकू शकलो, पण शेअरबाजारातील लोकांची मानसिकता समजण्यात मी कमी पडलो,” असं न्यूटन स्वतःहून म्हणाले होते. इतकं की, त्यानंतर जर कोणी 'South Sea' असा शब्द जरी उच्चरला तरी न्यूटन यांची चिडचिड व्हायची!
📌 यातून आपण गुंतवणूकदारांनी काय शिकावं ?
👉🏼 गुंतवणूक ही माहितीवर आधारित असावी, भावनांवर नाही.
👉🏼 बाजारात जोश जास्त असेल तेव्हा संयमाने आणि शहाणपणाने वागा.
“👉🏼 मी कधीच चुकणार नाही” – हा अहंकार फार महागात पडतो.
टीम नेटभेट