नेता असलात, किंवा प्रमुख असलात तरीही तुमच्या हातून चुका होणं हे स्वाभाविकच असतं, किंबहुना आपल्या हातून चुका होणं हे अपरिहार्य असतं. त्यामुळे जर तुमच्याही हातून चुका होत असतील तर स्वतःवर चिडू नका, स्वतःबद्दल नकारात्मक भावना बाळगू नका. कारण, तुमची वाढ होताना तुमच्या हातून चुका होणं हे नैसर्गिक आहे हीच बाब स्वतःला समजावून सांगा.
स्टीव्ह ऑडेबटो (पी.एच.डी) यांच्या मते, एखाद्या नेत्यातला सर्वात उत्तम गुण कोणता, तर झालेली चूक कबूल करणे.. नेता म्हटलं की कित्तीतरी निर्णय घ्यावे लागतात आणि अर्थातच त्यापैकी काही निर्णय चुकतात, हे स्वाभाविक आहे. असं जेव्हा होतं, तेव्हा आपले निर्णय चुकले त्यांची कबूली स्वतःहून देणारे असंख्य नेते भवताली दिसतात. अनेकांना असं वाटत असले की अरे या नेत्याने (प्रमुखाने) चूक कबूल करून शुद्ध बावळटपणा केला, किंवा तो किती दुबळा आहे हेच त्याने दाखवलं असंही त्यांचं म्हणणं असू शकेल, पण प्रत्यक्षात असं करण्यातच त्यांची हिंमत त्यांनी दाखवलेली असते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
जेव्हा कोणी नेता त्याची चूक प्रांजळपणे कबूल करतो तेव्हा त्यातून इतरांना हे दिसतं, की तो नेता किती प्रामाणिक आहे, तो नात्यांना किती महत्त्व देतो आणि जपतोसुद्धा, शिवाय, तो एक चांगला माणूस असल्याचीही खात्री इतरांना पटते व त्यामुळे त्यांचा आपल्या नेत्यावरचा विश्वास दृढ होतो.
म्हणूनच, जर तुम्ही नेते वा प्रमुख असाल तर चुका करा पण त्या प्रांजळपणे कबूलही करा. इतरांना जाणवू देत, की तुम्हीही माणूसच आहात व तुमच्याकडूनही लहानमोठ्या चुका होत रहातात.. परंतु चूक कबूल करणं हा मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ आहे आणि तुमच्या चुकीबद्दल तुम्ही माफी मागून त्या चुकीची पूर्ण जबाबदारी उचला. आपल्याकडून एखादी चूक का झाली त्याची नीट कारणमिमांसा करून पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्या.
लक्षात ठेवा, श्रेष्ठ नेता तोच असतो जो चुका नम्रपणे व प्रांजळपणे कबूल करतो आणि त्या वेळीच बदलतो.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया