"भाषा, एकता आणि समृद्धी : सिंगापूरचं यश आपल्यासाठी धडा"

१९६५ मध्ये मलेशिया पासून वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून बाहेर पडलेल्या सिंगापोरची अवस्था फार चांगली नव्हती. छोटासा भूभाग, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव आणि अकुशल नागरिक यामुळे सिंगापोरची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात होती. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे गेल्या ६ ० वर्षांत सिंगापोरने केलेली प्रगती थक्क करणारी आहे.
एक लक्षात घ्या, केवळ एकाच पिढीच्या अंतरात मागासलेल्या देशापासून (Third World Country) विकसित देशापर्यंत (first world country) झेप घेणारा सिंगापोर हा एकमेव देश आहे.
यामागे अनेक कारणं आहेत. सामाजिक शिस्त, भ्रष्टाचारावर असलेली कडक शिक्षा, चांगल्या शिक्षणावर दिलेला भर , गुणवत्तेवर आधारित व्यवस्था ही काही मुख्य कारणं! पण याहीपेक्षा महत्वाचं कारण जे मला वाटतं ते सिंगापूरी जनतेची एकसंधता. सिंगापोर मध्ये प्रामुख्याने चिनी,मलय आणि भारतीय वंशांचे लोक राहतात. तिघांच्याही संस्कृती , प्रथा आणि मान्यता वेगवेगळ्या आहेत. तरीही त्यांना एकत्र बांधणे तेथील राज्यकर्त्यांना जमले आणि त्यामुळेच आजचा सफल सिंगापोर तयार झाला. जगभरातील लोकांची स्थलांतरासाठी पाहिली पसंती सिंगापोर च असते. व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील सिंगापोरची निवड करण्यात येते.


सिंगापोर मध्ये देखील एक-भाषेची अडचण होती जशी आपल्याकडे आहे. यावर त्यांनी शोधलेला उपाय आणि अतिशय काटेकोरपणे तो राबविण्यात आलेले यश यांचा सिंगपोरच्या आजच्या यशात मोठा वाटा आहे. १९६५ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा तिथे मँडरिंन , मलय आणि तामिळ या प्रमुख भाषा बोलल्या जात असत. यापैकी कोणतीही भाषा सरकारने अधिकृत व्यवहार भाषा म्हणून निवडली असती तर इतर भाषिकांच्या अस्मिता दुखावल्या असत्या आणि त्यांनी कधीही त्या भाषेचा स्वीकार केला नसता.
पण सिंगापोरने जगाशी व्यवहार करण्याच्या दृष्टीने एका परकीय भाषेचा म्हणजे इंग्लिश भाषेचा म्हणजे इंग्लिश भाषेचा स्वीकार केला. त्यामुळे कोण्या एका गटाला वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली नाही. आणि जागतिक पातळीवरील व्यवहारांसाठी सिंगापोर मधील जनता तयार झाली. प्रत्येकाला इंग्लिश शिकणे अनिवार्य झाले कारण सरकारी कामकाज इंग्लिशमध्येच होत होते. त्यासोबत प्रत्येकाला आपली मातृभाषा शिकणे शक्य होते. या उपायांमुळे देशाची मानसिकता जागतिक पातळीवर विचार करण्याच्या तयारीची झाली.


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================

आपला देश मोठा आहे, विविधता जास्त आहे. आपल्या देशाचे अनेक नागरिक केवळ एकच भाषा जाणतात. त्यामुळे सिंगापोरचा उपाय आपण अंमलात आणणे कठीण वाटले तरी ते अशक्यप्राय नाही असे माझे मत आहे. हिंदी संपूर्ण देशावर लादली तर पश्चिम आणि दक्षिणेकडील लोक ते स्वीकारणार नाहीत. आणि समजा संपूर्ण देशाने हिंदी भाषा स्वीकारली तरीही जागतिक व्यवहारांसाठी फारसा उपयोग होणार नाहीये.


मी स्वतः मातृभाषेचा पुरस्कर्ता आहे तरीही जगासोबत चलायचं असेल तर इंग्लिश आलीच पाहिजे हे माझे मत पक्के झाले आहे. त्यामुळे व्यवहारासाठी इंग्लिश आणि सांस्कृतिक घडण व्हावी म्हणून मातृभाषा एवढेच पुरेसे आहे. निर्णय आपल्याला घ्यायचाय अंतर्वक्री रहायचं आहे की बहिर्वक्री? clarity निवडायची की confusion? सिंगापोर सारखी श्रीमंती मिळवायची की आहे त्या परिस्थितीत रहायचं! एक देश म्हणून आपण काय करायचं?
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com