"जजिंग द ओशन बाय वन वेव्ह: विनोद कांबळीच्या कथेतून एक धडा"

ते विनोद कांबळी वर हळवं कातर , सहानुभूती युक्त लिहिणं गरजेचं आहे का ? सचिन आणि विनोदवर तुलनात्मक लिहिणं गरजेचं आहे का?

विनोदचं आयुष्य तो त्याच्या हिशोबाने जगला असेलच ना...काही कॉम्प्रेमाईस नसतील केले त्याने आणि त्याबदल्यात काही केले असतील. नसेल त्याने आपल्या व्याख्येत बसणारं यश मिळवलं... म्हणून त्याच्यावर फेल्युअर चा ठपका तरी कशाला लावायचा.त्याच्यापेक्षा कमी क्रिकेट खेळून कधीच विस्मृतीत गेलेले शेकडो खेळाडू असतील.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -https://salil.pro/MBA
============================

माणसाच्या यशपयशात त्याचे मन, परिस्थिती, नाती, सानिध्य, मनस्थिती, विचार, सवयी, DNA, वातावरण, संधी, नशीब, कौशल्य , समाज, वेळ, स्थळ, आरोग्य अशा अनेक गोष्टींची सरमिसळ असते. यापैकी कुठल्यातरी एका नेमक्या गोष्टीवर बोट ठेवून तेदेखील आपल्याला पुरेश्या माहीत नसलेल्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल जगजाहीर मतप्रदर्शन करणे. आणि इतक्या व्यापक प्रमाणात करणे हेच मुळी सकस वागणुकीचे लक्षण वाटत नाही,

दोन दिवसंपासून नुसते सहानुभूतीचे पाट वाहतायत सोशल मीडियावर ...अरे ,त्याची त्याची बाजू असेल की काहीतरी. आपल्याला नाही दिसली म्हणून ती अस्तित्वातच नाही असे कसे होईल. आणि तो कुठे माझी बाजू ऐकाच असे सांगत आहे...He has made peace with his life...i think we should also do. Lets.not compare him..Let's not judge him.

To judge a man by his weakest link or deed is like judging the power of ocean by one wave. - Elvis Presley

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Salil Chaudhary
A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.