There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
1996 मध्ये रिबॉकने यूएस ऑलिंपिक टीमचं प्रायोजकत्व घेण्यासाठी $50 मिलियन खर्च केले. त्यांना वाटलं की या ऑलिम्पिक मध्ये आता त्यांच्याच ब्रॅण्डचा बोलबाला असणार. पण नायकीने एक भन्नाट योजना आखून सगळं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि ब्रँडिंगची लढाई जिंकली.
अटलांटा ऑलिंपिक फक्त खेळांसाठीच नाही, तर जाहिरातींसाठीही ऐतिहासिक ठरणार होतं. 10 मोठ्या प्रायोजक कंपन्यांनी, जसं की कोका-कोला, आयबीएम, कोडॅक यांनी मिळून $400 मिलियन खर्च केले. पण नायकीचं काय?
नायकी अधिकृत प्रायोजक नव्हती, पण ती बाजूला बसणार नव्हती. नायकीच्या CMOने जाहीर केलं: "ऑलिंपिकचं प्रायोजकत्व न घेता देखील आम्ही तिथे राज करू."
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live
93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -https://salil.pro/MBA
============================
त्यांनी काय केलं
#१. नायकी पॅव्हिलियन:
नायकीने ऑलिंपिक व्हिलेजच्या जवळ 15,000 चौरस फुटांचा शानदार पॅव्हिलियन उभारला. इथे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येण्यासाठी, आराम करण्यासाठी, आणि मुलाखती देण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली.
#२. अटलांटा शहरात बिलबोर्ड्सचा महापूर:
नायकीने 1,000 हून अधिक बिलबोर्ड्स अटलांटा शहरात लावले. प्रत्येक बिलबोर्डवर त्यांची सर्वात प्रसिद्ध स्लोगन होती :
"You don’t win silver — you lose gold." (तुम्ही रौप्य पदक जिंकत नाही....तर सुवर्ण पदक हारता !"
यासाठी त्यांनी $5.7 मिलियन खर्च केले आणि 632 मिलियन लोकांपर्यंत पोहोचले.
#३ . गोल्डन शूजची जादू:
नायकीचे "गोल्डन शूज" घालून मायकेल जॉन्सन धावला, त्याने जागतिक विक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकलं. कितीही पैसे देऊन मिळविता आली नसती अशी प्रसिद्धी जॉन्सनने घातलेल्या सोनेरी बुटांनी मिळवून दिली.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live
93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -https://salil.pro/MBA
============================
निकाल:
स्पर्धा सम्पल्यानंतर एका सर्वेक्षणात आढळलं की जास्तीत जास्त अमेरिकन लोकांना वाटलं की नायकीच अधिकृत प्रायोजक आहे, तर फक्त 16% लोकांना रिबॉकचं प्रायोजकत्व माहित होतं.
ऑलिंपिक संपल्यानंतर नायकीच्या विक्रीत 22% वाढ झाली. रिबॉकला मागे टाकत नायकीने ही लढाई जिंकली!
सगळीकडे पैसाच काम करतो असे नाही...संपत्तीपेक्षा कल्पकता नेहमीच जिंकते! 👟✨
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Salil Chaudhary
A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.