There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुगल सर्च इंजिनचा आपण दैनंदिन जीवनात प्रचंड वापर करू लागलो त्यालाही आता अनेक वर्ष लोटली आहेत. गुगलची अशी अनेक फीचर्स आहेत ज्याचा आपण अगदी दररोज वापर करत असतो, त्यापैकीच आज आम्ही अशी 10 फीचर्स सांगणार आहोत जी करतील तुमच्या घाईच्या वेळी तुम्हाला मदत -
1. कॅलक्यूलेशन्स -
घाईच्या वेळी हिशोब करण्यासाठी आपण मोबाईलमधलं कॅल्सी हल्ली सहज वापरू लागलो आहोत मात्र, जेव्हा लॅपटॉपवर काम करत असता, तेव्हा मोठमोठाले हिशोब करण्यासाठी एक सोपी गुगल ट्रीक तुम्ही वापरू शकता. वेबसाईटची यूआरएल जिथे टाईप करतो तिथे डायरेक्ट तुम्ही तुमचं गणित टाईप करायला लागलात तर लगेचच तिथे खाली तुम्हाला त्या गणिताचं उत्तरही दिसू लागतं... विश्वास नाही बसत .. ट्राय करून पहा.
2. फ्लाईटची माहिती -
जे लोक अगदी रोज विमानाने प्रवास करत असतात त्यांच्यासाठी ही अगदी सोपी ट्रिक. तुम्हाला तुमच्या विमानाची माहिती हवी असेल तर गुगल सर्च इंजिनमध्ये तुमच्या फ्लाईटचा नंबर एंटर करा आणि लगेचच तुम्हाला त्या फ्लाईटची संपूर्ण माहिती समोर दिसेल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. टेक अ ब्रेक -
दिवसभर ऑफीसमध्ये लॅपटॉपसमोर बसून आपलं नियोजीत काम करताना जर एखादा ब्रेक हवा असेल तर अनेक कर्मचारी पाय मोकळे करायला जातात, चहा प्यायला जातात किंवा शेजारच्या कर्मचाऱ्याशी गप्पा मारत बसतात.. त्याऐवजी तुम्ही गुगलवरच डायरेक्ट गेम खेळून पाच मिनीटांचा शॉर्ट ब्रेक घेऊ शकता. त्यासाठी इतकंच करायचं, गुगल सर्च इंजिनमध्ये जाऊन google play doodle game असं सर्च करताच तुम्हाला तिथेच अनेक गेम्स खेळायचा ऑप्शन ओपन होईल. तुम्ही तुमच्या आवडीचे गेम तिथल्यातिथे काही मिनीटांसाठी खेळून जरा शॉर्ट ब्रेक घेऊ शकता.
4. इमेजवरून जागा वा माणसं शोधा -
गुगलवर काहीही शोधा .. सापडतंच असं हल्लीचं जग म्हणतं आणि ते बऱ्याच अंशी खरंसुद्धा आहे. गुगलवर चक्क माणसंही सापडू शकतात हे तुम्हाला ठाऊक आहे का.. म्हणजे तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीचा वा जागेचा फोटो असेल तर गुगलवर सर्च इमेज ऑप्शनवर क्लिक करा, तुमच्याजवळचा फोटो तिथे अपलोड करा आणि सर्च म्हणा.. म्हणजे गुगलकडे त्या व्यक्तीची, त्या फोटोबाबतची वा त्या जागेबाबतची जी माहिती असेल ती क्षणार्धात तुमच्यासमोर येईल.
5. गुगल अंडरवॉटर -
ही एक भन्नाट कॉन्सेप्ट गुगल डाय हार्ड यूझर्सना माहिती असेल, मात्र जनरली याबद्दल सामान्य लोकांना अद्याप माहिती नाही. गुगल सर्च जर पाण्यात बुडवलं तर कसं दिसेल हे तुम्ही या फीचरमध्ये पाहू शकता. गुगल अंडरवॉटर असं सर्च इंजिनमध्ये टाईप केल्यावर तुम्हाला हा पर्याय सापडेल. त्यावर क्लिक करताच तुमचं गुगल सर्च इंजिन पाण्यात बुडाल्याचं फील तुम्हाला तुमची स्क्रीन देईल. या अंडरवॉटर गुगलमध्येच आणखी अशी इतकी भन्नाट फीचर्स आहेत की ज्यावर तुमचा वेळ छान मजेत जाऊ शकतो. डायनोसोर गेम टू डी, थ्री डी, पॅकमॅन गेम, स्नेक गेम आणि त्याचबरोबर गुगल मिरर, गुगल स्नो, गुगल डार्क मोड, गुगल ग्रॅव्हिटी, गुगल झिपर असे भन्नाट ऑप्शन्स या मेन्यूमध्ये सापडतील.. गुगल फॅन, गुगल झिपर पहाताना तर खूपच धमाल येते हे खरं..
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com