Learn HTML web Design in Marathi
Contact us

HTML Fundamentals

जगातील प्रत्येक वेबसाईटचा मूळ पाया म्हणजे HTML ही प्रोग्रामिंग भाषा. अतिशय सोपी आणि तितकीच रंजक असलेली ही कोडींगची भाषा शिकविणारा हा मराठी ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व सभासदांसाठी मोफत उप्लब्ध करुन देत आहोत.

Instructor: Shubhangi BajajLanguage: Marathi

About the course

मराठीतून सर्वप्रथम! आता "HTML Basic" शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची अनुभव नसला तरी !)

जगातील प्रत्येक वेबसाईटचा मूळ पाया म्हणजे HTML ही प्रोग्रामिंग भाषा. अतिशय सोपी आणि तितकीच रंजक असलेली ही कोडींगची भाषा शिकविणारा हा मराठी ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व सभासदांसाठी मोफत उप्लब्ध करुन देत आहोत. वेब डिझाईन क्षेत्रामध्ये काम करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकालाच हा कोर्स खुप उपयोगी ठरेल.

What Will I Learn ?​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल

ईंटरनेटचे काम कसे चालते ?
वेबसाईट म्हणजे काय?
वेबसाईट कशाने बनते?
HTML म्हणजे काय?
HTML code कसा लिहायचा?

HTML code कसा वाचायचा?

 

Who is this for ?​हा कोर्स कोणासाठी आहे ?

HTML शिकण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही

कोणतीही वेबसाइट तयार करू इच्छित आहे

तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे ? 
किंवा तुम्हाला "वेब डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात

 

Benefits of Online Learning​ऑनलाईन शिकण्याचे फायदे

स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.

 

Benefits of Learning HTML  Course  - HTML  शिकण्याचे फायदे

HTML शिकण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला तुमची वेबसाईट बनवता येईल .ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की !

मित्रांनो, तुम्ही पण आजच "HTML basics" शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !

 

Course Description ​कोर्सबद्दल माहिती
नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स "HTML basics ".

मूलभूत गोष्टींमधून आपण HTML वापरुन वेब डिझाइनिंग शिकाल.HTML चा वापर करून वेबसाईट कशी बनवायची ते शिकणार आहात. या साठी प्रोग्रामिंगची ओळख नसली तरी चालेल.हा कोर्स संपताना तुम्ही सर्व वैशिष्ट्यांसह HTML वापरण्यात कुशल व्हाल.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 

आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy