Graphic Design for Entrepreneurs (No Photoshop)
Contact us

Graphic Design for Entrepreneurs (No Photoshop)

फक्त आपल्या मोबाईल मधील मोफत अप्लिकेशन्स आणि कंप्युटर मध्ये आधीपासूनच असलेल्या पॉवरपॉइंट या सॉफ्टवेअर मधून आकर्षक आणि प्रभावी ग्राफिक्स व व्हीडीओ कसे बनवावे हे तुम्ही यामधून शिकणार आहात. केवळ २-३ दिवसांतच तुम्ही आपल्या बिझनेससाठी सुंदर ग्राफिक्स आणि व्हीडीओ बनवायला सुरुवात करु शकता.

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

प्रत्येक उद्योजकाच्या मनात आपल्या प्रॉडक्ट किंवा सेवा ग्राहकांसमोर कशा मांडाव्या याच्या काही कल्पना असतात. मात्र त्यासाठी उद्योजकाला ग्राफिक डिझाइनर्स वर अवलंबून रहावे लागते. या प्रक्रियेत पैसे तर जातातच पण उद्योजकाचा महत्त्वाचा वेळही खर्च होतो. आणि बहुतेकवेळा आउटपुट मनासारखं मिळतंच असं नाही. त्यातच सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात चांगल्या ईमेजेस आणि छोटेखानी व्हीडीओ यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांमुळे सध्या प्रत्येक उद्योजकाला हे तंत्र स्वतः आत्मसात करणे गरजेचे आहे.

मित्रांनो, म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक ऑनलाईन , मराठी कोर्स "उद्योजकांसाठी सहजसोपी ग्राफिक डिझाईन". यामध्ये फोटोशॉप सारखे कठीण आणि महाग सॉफ्टवेअर्स शिकण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईल मधील मोफत अप्लिकेशन्स आणि कंप्युटर मध्ये आधीपासूनच असलेल्या पॉवरपॉइंट या सॉफ्टवेअर मधून आकर्षक आणि प्रभावी ग्राफिक्स व व्हीडीओ कसे बनवावे हे तुम्ही यामधून शिकणार आहात. केवळ २-३ दिवसांतच तुम्ही आपल्या बिझनेससाठी सुंदर ग्राफिक्स आणि व्हीडीओ बनवायला सुरुवात करु शकता.

तर मग उद्योजक मित्रांनो आजच उद्योजकांसाठी सहजसोपा ग्राफिक डिझाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा ! आणि आपल्या मार्केटिंगच्या भात्यात या ब्रम्हास्त्राचा समावेश करा !

कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये -

✔️ ऑनलाईन कोर्स (मोबाईल आणि कंप्युटर मध्ये शिकू शकता)
✔️ घरुन किंवा ऑफिसमधून शिका, कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
✔️ सोप्या मराठीतून शिकविलेला प्रॅक्टीकल कोर्स
✔️ महागडे सॉफ्टवेअर्स विकत घेण्याची आवश्यकता नाही
✔️ ईमेजेस, बॅनर्स, डेमो व्हीडीओ, इन्ट्रोडक्शन व्हीडीओ असे व्यवसायासाठी उपयोगी ग्राफिक्स
✔️ सहा महिन्यात आणखी नविन टूल्सचा समावेश असलेले लेसन्स मोफत
✔️ प्रश्न विचारण्यासाठी DOUBTS सेक्शन

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy